Skip to content

कात्रज बोगद्याजवळ बस व रिक्षाचा भीषण अपघात

सुखसागर नगर येथील रिक्षा चालकांचा मृत्यू

PG
Prashik Ghaste

1 min read

कात्रज बोगद्याजवळ बस व रिक्षाचा भीषण अपघात

सुखसागर नगर येथील रिक्षा चालकांचा मृत्यू

पुणे: आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार (ता. २३) रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर एसटी बस (MH 10 DT 2697) व ऑटो रिक्षा (MH 12 GS 9695) या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. ऑटो रिक्षा मधील चार इसम जखमी झाले. सदर एसटी बस ही स्वारगेट वरून विटा, सांगली कडे जात होती तर रिक्षा खेड शिवापुर कडून स्वारगेटच्या दिशेने येत होती.

सदर अपघातामध्ये रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२ वर्षे, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) हे मयत झाले असून राजेश इंगवले (वय ४८ वर्षे, रा. गोकुळ नगर, कात्रज कोंढवा रोड), दशरथ निरगुडे (वय ४३ वर्षे, रा. बिबवेवाडी), शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे तिघेजण जखमी आहेत.

बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय ५३ वर्षे, रा. खानापूर, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Fatal accident involving bus and rickshaw near Katraj tunnel

Share