Skip to content

FASTag Annual Pass 2025 : 15 ऑगस्टपासून फास्टटॅग ‘वार्षिक पास’; अवघ्या 3 हजारात 200 टोल फेऱ्यांची मुभा

• वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय; वर्षाला 10 हजारांची बचत होणार

V
Vivek

1 min read

FASTag Annual Pass 2025 : 15 ऑगस्टपासून फास्टटॅग ‘वार्षिक पास’; अवघ्या 3 हजारात 200 टोल फेऱ्यांची मुभा

•वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय; वर्षाला 10 हजारांची बचत होणार

ANI | केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीत मोठा बदल करत वाहनधारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरातील टोल नाक्यांवर ‘फास्टटॅग आधारित वार्षिक पास’ सुविधा सुरू होणार आहे. हा पास अवघ्या ३ हजार रुपयांमध्ये मिळणार असून, वाहनधारकाला वर्षभरात २०० वेळा टोल नाक्यावरून प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

हा पास केवळ गैरव्यावसायिक खासगी चारचाकी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन आदी) उपलब्ध असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) संकेतस्थळावर आणि 'हायवे मोबाइल अ‍ॅप'वर लवकरच पाससाठी स्वतंत्र लिंक सुरू केली जाणार आहे.

टोल नाक्यांवरील त्रासाला आळा, प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार या योजनेमुळे टोल नाक्यांवरील वाहतूक गतीमान होईल, तिथे होणारे वाद आणि विलंब कमी होतील, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यानुसार, सध्या एकाच टोलवर 50 ते 80 रुपये इतका खर्च वाहनधारक करतो. मात्र नवीन पासमुळे प्रत्येक फेरीसाठी केवळ 15 रुपये सरासरी दर बसेल. यामुळे वार्षिक 10 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

या निर्णयामुळे विशेषतः अशा नागरिकांना दिलासा मिळेल जे दररोजच्या प्रवासात टोल नाक्यांवरून पास होतात. 60 किलोमीटर परिसरातील नाक्यांवर पासाचा विशेष लाभ होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक सवलतीचाही यामधून अंतर्भाव होईल.

हेही वाचा: Mumbai Crime News : विमा हप्त्यावर सवलतीचे आमिष… व्यावसायिकाची दोन लाखांची फसवणूक!

Share