Skip to content

Emergency News : कात्रजमध्ये थरार! अग्निशमन जवानांची तत्परता; लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्यासह पाच जण सुखरूप

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी Emergency News: कात्रजमधील दत्तनगर येथील ऋतुगंधा सोसायटीच्या लिफ्टमध्ये रविवारी (दि.

VZ
Vidula Zagade

1 min read

Emergency News : कात्रजमध्ये थरार! अग्निशमन जवानांची तत्परता; लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्यासह पाच जण सुखरूप

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी Emergency News: कात्रजमधील दत्तनगर येथील ऋतुगंधा सोसायटीच्या लिफ्टमध्ये रविवारी (दि. २) अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह पाच जण अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या सर्वांची सुखरूप सुटका झाली आणि मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.Emergency News

ऋतुगंधा सोसायटीतील लिफ्टमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह चार ज्येष्ठ नागरिक अडकल्याची घटना घडली. बंदिस्त लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची अवस्था चिंता आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले. या घटनची माहिती कात्रजच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर चालक गोगावले यांच्यासह फायरमन किरण पाटील, विनायक घागरे आणि लियाकत मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. लिफ्टचे दार उघडणे शक्य नसल्याने जवानांनी हायड्रोलिक स्प्रेडर आणि कटावणीच्या सहाय्याने लिफ्ट सुरक्षितपणे उघडली. त्यानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.Emergency News

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक बचाव साहित्याच्या मदतीने लिफ्ट उघडण्यात आली. सर्व नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.”

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून सोसायटीतील नागरिकांनी जवानांच्या कार्याचे कौतुक केले.Emergency News

Emergency News

Share