Skip to content

दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

रस्ता ओलांडणार्‍या ७९ वर्षीय वृद्ध महिलेला दुचाकीची जोरात धडक

PG
Prashik Ghaste

1 min read

दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

रस्ता ओलांडणार्‍या ७९ वर्षीय वृद्ध महिलेला दुचाकीची जोरात धडक

पिंपरी : नोव्हेल स्कूलजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणार्‍या ७९ वर्षीय वृद्ध महिलेला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना १३ मे रोजी घडली.

या प्रकरणी दीपक रवि जोगदंड (२०, चिंचवड) यांनी बुधवारी (२७ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गोविंद दत्तात्रय म्हस्के (२५, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांची आजी मनुबाई प्रल्हाद साकळे या रस्त्यावरील दुभाजकातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत होत्या. त्या जेवणाचा डबा घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना, थरमॅक्स चौकाकडून आलेल्या आरोपीच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मनुबाई यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Share