Parbhani News : परभणीत शेतकरी मेळावा; ‘बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही’ – एकनाथ शिंदे
Parbhani News :परभणी : दुष्काळामुळे पिके करपली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
1 min read

Parbhani News :परभणी : दुष्काळामुळे पिके करपली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, कोणत्याही शेतकऱ्याने खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नये. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असून, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात दिली https://maharashtramirror.com/ Parbhani News :
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते राज्यातील गरजू कुटुंबांसाठी २५ हजार सायकली आणि २५ हजार शिलाई मशीनच्या वितरणाचा, तसेच रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Parbhani News :
राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांवरील संकटाबाबत आपण नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याबाबत सरकारने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात धीर सोडू नये. सरकार त्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


