Skip to content

Eid E Milad 2024 | जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तर्फे विविध उपक्रम

अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान व ब्लॅंकेट वाटप | Eid E Milad 2024

M
Mubarak

1 min read

eid e milad 2024

  • अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान व ब्लॅंकेट वाटप | Eid E Milad 2024
  • पुणे, दि. १७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर :

    जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (Maharashtra Muslim Front) या सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यालय कॅम्प विरवानी प्लाझा येथे दारुल उलूम मुहम्मदिया अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना अन्नदान, ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कुरान पठण केले.

    महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर Nadim Mujawar, पुणे शहर अध्यक्ष रफिक मुल्ला सर, संघटनेचे खजिनदार इरफान शेख, सल्लागार मजहर खान, कोर कमिटी सदस्य - मुश्ताक ज़िकरे,सरताज खान, एजाज सय्यद, हमीद काझी, असलम शेख, युनुस मणियार, अबुभाई इनामदार, बशीर शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष नाहिद मुजावर, इम्तियाज शेख, मुजम्मिल यादगीर,सलीम भाई, असद मुजावर, मकसूद सावकार, आदि यावेळी उपस्थित होते.

    हजरत मोहमद स.अ.स. यांची शिकवण आणि त्याचे अनुसरण मानवजातीसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी यावेळी केले.

    https://maharashtramirror.com/web-stories/pune-ganesh-visarjan-2024-deputy-minister-ajit-pawar/

    Share