Skip to content

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आधार कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार: माधुरी मिसाळ

कल्याणकारी योजनांचा लाभ केवळ निराधार ज्येष्ठानींच नव्हे तर सर्वच ज्येष्ठांनी घेण्याचे आवाहन

PG
Prashik Ghaste

1 min read

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आधार कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार: माधुरी मिसाळ

कल्याणकारी योजनांचा लाभ केवळ निराधार ज्येष्ठानींच नव्हे तर सर्वच ज्येष्ठांनी घेण्याचे आवाहन

निलेश राऊत
पुणे: वृद्धाश्रमातील ज्येष्ठाना तसेच दिव्यांगांना आधार कार्ड मिळणे सुलभ व्हावे व त्यायोगे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. माधुरी मिसाळ म्हणाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या ज्येष्ठांसाठी अनेक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ केवळ निराधार ज्येष्ठानींच नव्हे तर सर्वच ज्येष्ठांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्यावतीने, श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवास, नवरत्न वृद्धाश्रम व स्वामीआंगण वृद्धाश्रमांना विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नवरत्न ओल्ड एज होमच्या अनिता राकडे, श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवासचे विकास देडगे व आदित्य देडगे, स्वामीआंगण वृद्धाश्रमच्या आनंदी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शासकीय योजनांचा लाभ घेताना आधार कार्डची गरज भासते मात्र ते सहज मिळत नसल्याने अडचणी येत आहेत अशी तक्रार केली असता "त्यावर त्वरित उपाययोजना करून अश्या गरजुंना आधार कार्ड सुलभतेने उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन", असे माधुरी मिसाळ म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत असून "महाराष्ट्र दिनाच्या" निमित्ताने तीन वृद्धाश्रमांना उपयुक्त साहित्य भेट देत असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

निराधारांना वृद्धाश्रमाचा मोठा आधार आहे मात्र आता सुस्थितीतील कुटुंबात ज्येष्ठांची अडचण वाटते व त्यांना वृद्धाश्रमात धाडले जाते हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वॉटर बेड, एअर बेड, व्हीलचेयर, हिटिंग व कुलिंग पॅड, डायपर, हॅन्ड ग्लोवज व इतर उपयुक्त वस्तू भेट देताना आम्हांस समाजाप्रतीच्या दायित्वाची आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचे समाधान लाभते असे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

Share