Skip to content

Pune news : ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

Pune news : पुणे : ज्येष्ठ आणि नामवंत हृदयरोगतज्ज्ञ तसेच रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ


Pune news : पुणे :
ज्येष्ठ आणि नामवंत हृदयरोगतज्ज्ञ तसेच रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ (वय ७५) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. मेंदूतील गंभीर आजाराशी त्यांची दीर्घकाळ झुंज सुरू होती. त्यांच्या निधनाने पुण्यासह देशातील हृदयरोग उपचार क्षेत्रातील अनुभवी आणि कुशल तज्ज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

डॉ. हिरेमठ यांनी हृदयरोग उपचार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. पुण्यातील पहिली अँजिओप्लास्टी त्यांनी १९८९ मध्ये केली होती. विशेषतः गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी प्रक्रियांमधील त्यांच्या कौशल्यामुळे देशभरातून तसेच परदेशातूनही रुग्ण उपचारांसाठी त्यांच्याकडे येत असत. हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारांमध्ये औषधोपचार आणि रक्तवाहिन्यांवरील प्रक्रियांचा एकत्रित वापर लोकप्रिय करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. जी. भाटे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. हिरेमठ यांच्यासोबत सुमारे चार दशकांचा सहवास होता. अनेक आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण उपचारप्रक्रियांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. रुग्णांच्या उपचारांसाठी ते कॅथ लॅबमध्ये सहा तासांहून अधिक काळही कार्यरत असत. नवीन वैद्यकीय तंत्रज्ञान आत्मसात करून रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याची त्यांची धडपड कायम होती.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना मेंदूतील गंभीर गाठीचे निदान झाले. शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा काम सुरू केले; मात्र पुढील उपचारांचा त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि आकलन क्षमतेवर परिणाम झाला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share