Skip to content

Washingtone News : ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा

Washingtone News :वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील आक्रमक भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा; तासाभरात सात पोस्ट होर्मुझमधील तेल वाहतूक, इराणी रियालची घसरण
ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा; तासाभरात सात पोस्ट होर्मुझमधील तेल वाहतूक, इराणी रियालची घसरण

Washingtone News :वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील आक्रमक भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. ट्रम्प यांनी अवघ्या एका तासात इराणशी संबंधित सात पोस्ट सोशल मीडियावर करत अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक दबावामुळे इराणची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडल्याचा दावा केला.https://maharashtramirror.com/ Washingtone News
ट्रम्प यांच्या पहिल्या पोस्टमध्ये इराणच्या नकाशावर त्यांचा फोटो दाखवण्यात आला. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचे नाव बदलून ‘ट्रम्प सामुद्रधुनी’ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या पोस्टकडेही विशेष लक्ष वेधले गेले. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा आणि तेल वाहतुकीशी संबंधित आकडेवारी शेअर केली. संघर्षापूर्वी या मार्गातून दररोज सुमारे दोन कोटी बॅरल तेलाची वाहतूक होत होती, तर आता ही वाहतूक सुमारे १.८ कोटी बॅरलपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Washingtone News
इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत मोठी घट झाल्याचेही ट्रम्प यांनी एका ग्राफिकद्वारे दाखवले. त्यांच्या पोस्टनुसार, २०२५ मध्ये दररोज सुमारे २० लाख बॅरल असलेली इराणची तेल निर्यात २०२६ मध्ये जवळपास शून्यावर आली होती. त्यानंतर निर्यातीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचेही या आकडेवारीत दाखवण्यात आले आहे.
इराणच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना ट्रम्प यांनी इराणी रियालच्या घसरणीचे ग्राफिक्सही पोस्ट केले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २०२५ च्या सुरुवातीला सुमारे ९ लाख रियाल असलेले चलन २२.७ लाखांहून अधिक झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून इराणच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेच्या दबावाचा परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला.
‘बाय-बाय खारग’ पोस्टने खळबळ
ट्रम्प यांनी एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेले खारग बेटावरील हल्ल्याचे चित्रही पोस्ट केले. या चित्रात इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खारग बेटावर लढाऊ विमान हल्ला करत असल्याचे आणि परिसरात मोठी आग लागल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टसोबत ट्रम्प यांनी ‘बाय-बाय खारग’ असा संदेश दिला. त्यामुळे इराणच्या तेल व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या या बेटाबाबत ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, ट्रम्प यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये इराणचा नकाशा शेअर करत त्यांनी ‘इराण एक अपयशी राष्ट्र बनत आहे’, असा दावा केला. त्यांच्या सलग पोस्टमधून इराणवर लष्करी तसेच आर्थिक दबाव कायम ठेवण्याचा अमेरिकेचा निर्धार दिसून आला.
मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे इराण आपले धोरण बदलण्यास भाग पडेल, हा दावा इराणने फेटाळून लावला आहे. इराणचे अर्थमंत्री अली मदनीझादेह यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची जबाबदारी इराण सरकार आणि नागरिकांची आहे, अमेरिकेच्या तिजोरीची नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे ट्रम्प यांच्या आक्रमक वक्तव्यांनंतर अमेरिका-इराण संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share