Dombivli Police News : चैन स्नॅचिंगचा ‘हॉटेल मॅनेजर’ गजाआड; डोंबिवली पोलिसांची दमदार कामगिरी
Dombivli Latest Chain Snatching News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना गाठून गळ्यातली चैन हिसकावणाऱ्या गुन्हेगाराला अटक
2 min read
Dombivli Latest Chain Snatching News : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना गाठून गळ्यातली चैन हिसकावणाऱ्या गुन्हेगाराला अटक
डोंबिवली :- सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या चेन स्नॅचर गुन्हेगाराला अखेर डोंबिवली पोलिसांनी अटक केली. Dombivli Police Station परेश किशोर घावरी (वय 35, रा. कल्याण पश्चिम) असे या अटकेत आलेल्या आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने हॉटेल मॅनेजर आहे. डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांत झालेल्या सलग चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आलं. Dombivli Latest Chain Snatching News
गुन्ह्यांची साखळी आणि पोलिसांची शोध मोहीम
डोंबिवली पूर्व येथील 90 फुटी रोड परिसरात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावण्याचे प्रकार घडत होते.23 जून 2025 रोजी एका महिलेकडून सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. त्यानंतर 9 जुलै रोजी मंजू अनिल शहा (वय 63, रा. ठाकुर्ली) यांच्याकडून 1.80 लाख किंमतीची 20 ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली गेली. दोन्ही घटनांमध्ये आरोपी दुचाकीवरून आला व भरधाव वेगाने पसार झाला.
पोलिस आयुक्त (ठाणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली, सह पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग), अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग, कल्याण), तसेच उप पोलीस आयुक्त (परिमंडळ ३, कल्याण) यांच्या देखरेखीखाली चैन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या नेतृत्वाखाली 172 सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. विविध ठिकाणांवर नाकाबंदी आणि अॅन्टी चैन स्नॅचिंग पथकाची रचना करण्यात आली.
चौकशी दरम्यान आरोपीने डोंबिवली पोलीस ठाणे व मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीतील एकूण तीन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
1.20 ग्रॅम व 10 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन (2.7 लाख)
2.पल्सर मोटारसायकल (MH-05/FS-9656) – 1.15 लाख
3.यामाहा स्कुटर (MH-05/FY-1470) – 1.70 लाख
एकूण किंमत – 5.55 लाख
या संपूर्ण कारवाईमध्ये डोंबिवली पोलीस ठाण्याचे तपास पथक पुढील अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, गोरखनाथ गाडेकर,पोलीस हवालदार सुनील भणगे , मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक,पोलीस शिपाई शिवाजी राठोड , नितीन सांगळे, निलेश पाटील, देविदास पोटे , राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे या पथकाने आरोपीला अटक केली असून आरोपीचा आणखी काही साथीदारांशी संबंध असल्याचा संशय असून, पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे तपास पथक करत आहे.


