Delhi News : रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
Delhi News : नवी दिल्ली : डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का दिला आहे.
1 min read

Delhi News : नवी दिल्ली : डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने मंजूर केलेला म्हात्रे यांचा जामीन आदेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला असून, त्यांना तीन दिवसांत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.https://maharashtramirror.com/ Delhi News
सुनावणीदरम्यान म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी हा खटला मॅजिस्ट्रेटसमोर चालणारा असून, मुख्य गुन्ह्यासाठी कमाल पाच वर्षांची शिक्षा असल्याचा युक्तिवाद केला. म्हात्रे यांनी यापूर्वी कोठडीत वेळ घालवला असून ते तपास आणि खटल्याला सहकार्य करत असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Delhi News
मात्र, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने म्हात्रे यांच्याविरोधातील अनेक गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख केला. त्यावर १९ पैकी १८वप्रकरणांत म्हात्रे निर्दोष सुटल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. सुप्रीम कोर्टाने संबंधित प्रकरणांच्या नोंदी मागवल्या असून, तोपर्यंत हायकोर्टाचा जामीन आदेश स्थगित ठेवला आहे.


