Skip to content

Pune News : बदलत्या जीवनशैलीमुळे तयार फराळाला वाढती पसंती; बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिवाळीत तयार फराळाला वाढती मागणी; नोकरदार महिलांची पसंती

Pune News :पुणे: दिवाळीचा सण जवळ आला की घराघरांत खमंग फराळाची लगबग सुरू होते.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

बदलत्या जीवनशैलीमुळे तयार फराळाला वाढती पसंती; बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिवाळीत तयार फराळाला वाढती मागणी; नोकरदार महिलांची पसंती
बदलत्या जीवनशैलीमुळे तयार फराळाला वाढती पसंती; बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिवाळीत तयार फराळाला वाढती मागणी; नोकरदार महिलांची पसंती

Pune News :पुणे: दिवाळीचा सण जवळ आला की घराघरांत खमंग फराळाची लगबग सुरू होते. चिवडा, लाडू, करंजी, चकली, शेव अशा पारंपरिक पदार्थांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र, बदलती जीवनशैली, कामाचा वाढता व्याप आणि वेळेची कमतरता यामुळे यंदा बाजारात तयार फराळाला चांगली मागणी दिसून येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नोकरी आणि व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना फराळाचे सर्व पदार्थ घरी बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. कामाचे दीर्घ तास आणि सुट्यांची मर्यादा यामुळे अनेक महिला तयार फराळ खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

काही महिला आजही घरच्या घरी चिवडा, लाडू आणि करंजी यांसारखे पदार्थ तयार करतात. मात्र, चकली आणि शेव यांसारखे पदार्थ बाजारातून विकत घेतले जातात. त्यामुळे घरगुती आणि तयार फराळाची सांगड घालत दिवाळीची तयारी केली जात आहे.

घरी फराळ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, तेल, गॅस आणि इतर साहित्याचा खर्च तसेच त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, तयार फराळ खरेदी करणे सोयीचे वाटत असल्याचे अनेक महिलांचे म्हणणे आहे. घरगुती फराळ आणि बाजारातील फराळ यांच्या खर्चात फारसा फरक जाणवत नसल्याने तयार फराळाकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

परंपरेचा गोडवा कायम ठेवत वेळेची बचत करण्यासाठी तयार फराळाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीत तयार फराळ हा अनेक कुटुंबांसाठी सोयीचा पर्याय ठरत आहे. “धावपळीच्या जीवनशैलीत फराळाचे सर्व पदार्थ घरी बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. तसेच साहित्य खरेदी आणि फराळ बनविण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे काही पदार्थ घरी बनवून चकली, शेव यांसारखे पदार्थ बाजारातून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे वेळेची बचत होते आणि दिवाळीची परंपराही जपली जाते.” भारती पवार, महिला ग्राहक

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share