Dilip Bhoir : "बंडखोरीपासून एकत्र येण्यापर्यंतचा प्रवास; दिलीप भोईर शिवसेनेत"
Dilip Bhoir Joined Eknath Shinde Shivsena : अलिबागमध्ये 21 जून रोजी होणार औपचारिक प्रवेश; मंत्री सामंत आणि आमदार दळवी उपस्थित
1 min read

Dilip Bhoir Joined Eknath Shinde Shivsena : अलिबागमध्ये 21 जून रोजी होणार औपचारिक प्रवेश; मंत्री सामंत आणि आमदार दळवी उपस्थित
अलिबाग | अलिबाग विधानसभा मतदारसंघातील राजकारणात एक नवा अध्याय सुरू होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून 33 हजार मते मिळवणारे आणि भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करत आहेत. Dilip Bhoir Joined Eknath Shinde Shivsena हा प्रवेश 21 जून रोजी अलिबागमध्ये होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात पार पडणार असून, या वेळी मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर राहतही प्रभावी मताधिक्य मिळवले होते. निवडणुकीनंतर त्यांच्यात आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यात जवळीक वाढली, आणि हेच नवे समीकरण आता अधिकृत स्वरूप घेणार आहे.
भाजपमध्ये परतण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असले, तरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकटवर्ती मानले जाणारे भोईर यांचा भाजपकडून नाकारला जाणे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले.
दिलीप भोईर यांनी स्पष्ट सांगितले की, “स्वतःच्या भागाचा विकास आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता हा एकमेव हेतू आहे. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे.”
आमदार दळवी यांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत, “आम्ही दोघे एकत्र आलो तर विकासाला गती मिळेल,” अशी प्रतिक्रिया दिली.
या प्रवेशानंतर अलिबागमधील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे, आणि भाजपची आगामी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


