Skip to content

Pune Crime : सुरक्षा साधनांअभावी उंचावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने कामादरम्यान उंचावरून खाली पडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना धानोरे येथील कांगारू पॉलीमर्स कंपनीत घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सुरक्षा साधनांअभावी उंचावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा
सुरक्षा साधनांअभावी उंचावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा

Pune Crime : आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने कामादरम्यान उंचावरून खाली पडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना धानोरे येथील कांगारू पॉलीमर्स कंपनीत घडली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune crime

अंकितकुमार रामउजागीर वर्मा (वय २३), शाहीद इस्तियाक खान (वय २९) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संदीप सतिश सिंगल (रा. भोसरी, पुणे), अलतमश इस्तियाक खान (वय २९, रा.चऱ्होली खुर्द, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुखराज रामउजागिर वर्मा (वय २०, चिंबळी फाटा, खेड, मूळ- सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune crime

धानोरे येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उंचावर लोखंडी कैचीला वेल्डिंग करण्याचे काम सुरू असताना मजुरांना हेल्मेट, हार्नेस किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने पुरवण्यात आली नव्हती. काम करत असताना फिर्यादीचा भाऊ अंकितकुमार आणि शाहीद हे दोघे थेट उंचावरून खाली असलेल्या लोखंडी अँगलवर पडले. या भीषण अपघातात गळ्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

Share