Pune News : धनकवडीत फ्लॅटमध्ये घुसून सव्वा लाखांचे दागिने लांबविले
पुणे, महाराष्ट्र मिरर : धनकवडी परिसरातील एका उघड्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून टेबलवर ठेवलेल्या पर्समधून १ लाख १८ हजार ३०७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
1 min read

Pune News : सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर : धनकवडी परिसरातील एका उघड्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून टेबलवर ठेवलेल्या पर्समधून १ लाख १८ हजार ३०७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन अज्ञात पुरूष आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ७७ वर्षीय वृद्धेने तक्रार दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील कासा सोसायटीजवळ असलेल्या ट्रायडंट सोसायटीच्या ‘ए/५०४’ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ७७ वर्षीय फिर्यादी महिला राहतात. दि. १७ रोजी सकाळी दहा वाजेपासून ते २९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे चार वाजेदरम्यानच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. फिर्यादी यांच्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचा पाहून आरोपींनी आत प्रवेश केला. त्यांनी थेट बेडरूम गाठून तेथील टेबलवर ठेवलेल्या पर्समधून १ लाख १८ हजार ३०७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून तेथून पोबारा केला. दरम्यान, घरातील पर्समधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धेने पोलिसांत धाव घेतली. सहकारनगर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News


