Skip to content

Delhi Crime: दिल्लीत धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चालक-कंडक्टरला अटक

Delhi Crime : नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून नोएडा येथे निघालेल्या १६ वर्षीय मुलीवर स्लीपर बसमध्ये चालक आणि वाहकाने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दिल्लीत धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार चालक-कंडक्टरला अटक
दिल्लीत धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार चालक-कंडक्टरला अटक

Delhi Crime :नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून नोएडा येथे निघालेल्या १६ वर्षीय मुलीवर स्लीपर बसमध्ये चालक आणि वाहकाने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेला जिवे मारण्याची धमकी देऊन काश्मीर गेटजवळ बसमधून बाहेर फेकण्यात आले. काश्मीर गेट पोलिसांनी चालक कुलदीप आणि वाहक संदीप या दोघांना अटक केली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi crime
पीडित मुलगी ४ ऑगस्टच्या रात्री घरातून निघाली होती. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे थांबा न समजल्याने ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौकात उतरली. पुढे जाण्यासाठी तिने एका स्लीपर बसला हात केला. चालक आणि वाहकाने बस नोएडा सेक्टर ६३च्या दिशेने जात असल्याचे सांगून तिला बसमध्ये घेतले.https://maharashtramirror.com/ Delhi Crime
बस सुरू झाल्यानंतर काही वेळाने वाहकाने मुलीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि वाहकाने तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. मुलीने प्रतिकार केला असता तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.आरोपींनी पीडितेला काश्मीर गेट आंतरराज्य बसस्थानकाजवळील रिंग रोडवर बसमधून बाहेर फेकून पळ काढला. त्यानंतर पीडितेने काश्मीर गेट पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिमारपूर परिसरातून कुलदीप आणि संदीप यांना अटक केली. संबंधित स्लीपर बस ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काश्मीर गेट पोलिस करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Delhi crime

Share