Skip to content

Pune News : पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लुटले

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने जवळ येत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दौंड-पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्याजवळ घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लुटले दौंड-पाटस रस्त्यावर भरदिवसा घटना; दुचाकीवरील दोन चोरट्यांचा प्रताप
पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लुटले दौंड-पाटस रस्त्यावर भरदिवसा घटना; दुचाकीवरील दोन चोरट्यांचा प्रताप

Pune News : दौंड-पाटस रस्त्यावर भरदिवसा घटना; दुचाकीवरील दोन चोरट्यांचा प्रताप

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने जवळ येत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दौंड-पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्याजवळ घडली. शुक्रवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेले.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी रंजना लक्ष्मण ठोंबरे (वय ४०, रा. गिरीम, बरोचा मळा, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) आणि ३(५) अन्वये दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे या दौंड-पाटस रस्त्यावरील वायरलेस फाट्याजवळ त्यांच्या मक्याच्या जाळीत झाडू मारत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी ठोंबरे यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. येथे पाणी नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर त्यातील एकाने ठोंबरे यांना खाली पाडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून तोडले आणि दोघेही तेथून पसार झाले. या घटनेत ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार मखरे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share