Skip to content

Delhi News : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार का?

Delhi News : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार का?
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार का?

Delhi News : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, दर प्रति बॅरल १०० ते ११५ डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयावरही दबाव असल्याने भारतीय तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News

मात्र, सध्या तरी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने वाढ करण्याची शक्यता नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. https://maharashtramirror.com/ Delhi News

तेल कंपन्यांना दररोज मोठा तोटा
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम देशातील सरकारी तेल कंपन्यांवर होत आहे. सध्याचे किरकोळ इंधन दर कायम ठेवल्यामुळे तेल कंपन्यांना दररोज सुमारे ५७० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास या कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा तातडीने भार ग्राहकांवर टाकण्याऐवजी परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महागाईचा दबाव वाढण्याची भीती
इंधनाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होऊन दैनंदिन वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

तूर्तास पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्याच्या भूमिकेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींची पुढील दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share