Crime News : बारामतीत पोलीस भरतीचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार
पोलीस उपनिरीक्षकासह एकावर गुन्हा दाखल
1 min read

पोलीस उपनिरीक्षकासह एकावर गुन्हा दाखल
पुणे, Crime News: पोलीस भरती व बँड भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime News

आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गंभीर गुन्हा असताना पोलीस प्रशासन आरोपींना अटक करीत नसल्याचा आरोप करीत पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पीडितेने सांगितले.
Crime News


