Skip to content

Crime News : शिर्डीत व्यवसायाच्या वादातून महिलेचा खून

अहिल्यानगर, महाराष्ट्र मिरर Crime News : व्यवसाय करण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एका फळविक्री करणाऱ्या महिलेचा दुसऱ्या महिलेने चाकू हल्ला करून खून केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबा मंदिराच्या गेटसमोर घडली आहे.

VZ
Vidula Zagade

1 min read

Crime News : शिर्डीत व्यवसायाच्या वादातून महिलेचा खून

शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघी अटकेत

अहिल्यानगर, महाराष्ट्र मिरर Crime News : व्यवसाय करण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एका फळविक्री करणाऱ्या महिलेचा दुसऱ्या महिलेने चाकू हल्ला करून खून केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबा मंदिराच्या गेटसमोर घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिर्डी येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघींना अटक करण्यात आली आहे. जयश्री क्षीरसागर (वय ३०) असे मयत महिलेचे नाव आहे.Crime News

फिजा पटेल (वय २२), अंजली खंडिझोड असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, फळविक्रीच्या जागेवरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर फिजा पटेल हिने संतापाच्या भरात चाकू काढून जयश्री क्षीरसागर यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी फिजा पटेल तसेच तिची साथीदार अंजली खंडिझोड यांना तातडीने अटक करण्यात आली आहे. दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.Crime News :

भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शिर्डी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू आहे.

Crime News :

Share