CRIME NEWS : वृद्धांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या महिलेनेच चोरले २.७० लाखांचे दागिने
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : वृद्ध आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या महिलेनेच घरातील सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे.
1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: वृद्ध आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या महिलेनेच घरातील सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांच्या माहितीनुसार, हडपसर येथील एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीसाठी एका महिलेची नियुक्ती केली होती. घरातील लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित महिलेने संधी साधून कपाटातील सुमारे २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पलायन केले.CRIME NEWS
घरातील दागिने गायब झाल्यानंतर संशय आल्याने तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला आहे.
CRIME NEWS


