Skip to content

CRIME NEWS : बनावट जीआरवर दोन ज़्युनिअर कॉलेज राजरोसपणे सुरू

पुण्यात शिक्षण विभागात खळबळ

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : बनावट जीआरवर दोन ज़्युनिअर कॉलेज राजरोसपणे सुरू

पुण्यात शिक्षण विभागात खळबळ

पुणे CRIME NEWS: बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची धूळ अद्याप खाली बसलेली नसतानाच पुण्यात आणखी एक गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. विमाननगर आणि हडपसर परिसरात बनावट शासन निर्णय (जीआर) आणि मान्यतापत्रांच्या आधारे दोन ज्युनिअर कॉलेज गेली तब्बल पाच वर्षे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने संबंधित संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.CRIME NEWS

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील ओम साई बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचलित केले जात असलेले विमाननगरमधील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज (इन्स्पायर कॉलेज) आणि हडपसरमधील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज (एपीके कॉलेज) यांच्याकडे बनावट मान्यतापत्रे आणि शासन निर्णय असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत समोर आले आहे.CRIME NEWS

जळगाव जिल्ह्यातील एका संस्थेला अकरावी-बारावी मराठी माध्यमासाठी दिलेल्या मान्यतापत्राचा संदर्भ वापरून हडपसर येथील कॉलेजसाठी बनावट मान्यतापत्र तयार करण्यात आले. तर विमाननगर येथील कॉलेजसाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या मान्यतापत्राचा आधार घेऊन बनावट कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकारातून शासनासह विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या सूचनेनुसार शिक्षण अधिकारी पद्मा धेंडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे या गैररप्रकाराचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओम साई बहुउद्देशीय संस्थेने हे बनावट अध्यादेश स्वतः तयार केले, की त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घेतली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.CRIME NEWS

या कॉलेजांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची तसेच, या कॉलेजांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.CRIME NEWS

दरम्यान, बोगस शालार्थ आयडी प्रकरणामुळे आधीच शिक्षण खात्याची प्रतिमा मलिन झाली असताना आता बनावट शासन निर्णयाच्या आधारे शैक्षणिक संस्था चालवल्याचे प्रकरण समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

CRIME NEWS

Share