CRIME NEWS : सोमाटणे फाटा येथे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त
1 min read

दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त
पिंपरी, CRIME NEWS: शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (२९ जून) सायंकाळी ५:२५ वाजण्याच्या सुमारास देहुरोडकडे जाणाऱ्या रोडवर, सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.CRIME NEWS

पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (२६, रा. चिंचवड) आणि रोहन सीताराम सावंत (२४रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ राणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रे, चाकू, कोयता, तलवार यांसारख्या शारीरिक इजा करणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी पप्पू याने १ देशी बनावटीचे पिस्तूल व १ काडतूस आणि आरोपी रोहन याने १ देशी बनावटीचे पिस्तूल व १ काडतूस विनापरवाना व बेकायदेशीररित्या स्वतःच्या जवळ बाळगले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमाटणे फाटा येथे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
CRIME NEWS


