CRIME NEWS : जबरी चोरीप्रकरणी तिघे अटकेत
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
1 min read

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: जबरी चोरीच्या गुन्ह्याचा बिबवेवाडी पोलिसांनी काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.CRIME NEWS

किरण एडबा झोंबाडे (वय २०, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), पंकज सुभाष पवार (वय २१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३०, रा. अपर बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोरून फिर्यादी रिक्षातून जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवली. त्यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर वस्तू हिसकावून घेत घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.CRIME NEWS
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना वरिल तिघांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
CRIME NEWS


