Skip to content

CRIME NEWS : आंबेगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघे अटकेत

अटक केलेल्यांत तडीपार आरोपीचाही समावेश

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : आंबेगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघे अटकेत

अटक केलेल्यांत तडीपार आरोपीचाही समावेश

पुणे CRIME NEWS: आंबेगाव खुर्द परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत जमलेल्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून कोयता आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.०४ वाजता दरी पुलाजवळील साई लॉज परिसर, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द येथे काही जण संशयास्पदरीत्या जमल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २२), अमर अशोक निसर्गंध (वय २४) आणि प्रथम नंदू गवळी (वय २४) यांना अटक करण्यात आली. आणखी दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.CRIME NEWS

झडतीदरम्यान आरोपींकडून एक लोखंडी कोयता आणि दोन मिरची पावडरची पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून ही हत्यारे जवळ बाळगली होती.

तपासात अटक आरोपी अभय उर्फ सोन्या निसर्गंध याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाल्याचेही समोर आले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतानाही तो आदेशाचे उल्लंघन करून परिसरात वावरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.CRIME NEWS

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.

CRIME NEWS

Share