Skip to content

Crime News : पिस्तूल विक्रीप्रकरणी तिघे गजआड

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या तिघा सराईतांना येरवडा पोलिसांनी गजाआड केले.

VZ
Vidula Zagade

1 min read

Crime News : पिस्तूल विक्रीप्रकरणी तिघे गजआड

येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या तिघा सराईतांना येरवडा पोलिसांनी गजाआड केले. आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूलएक जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.Crime News

महेश अशोक कांबळे (वय २१, रा. भुगाव), गणेश तुळशीराम पवार (वय २२, रा. नांदेड सिटी), यश चंद्रकांत उरणकर (वय २२, रा. पाषाण) अशी अटक़ केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना २८ जुलै रोजी रात्री चव्हाण चौकातून मुळीक फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन जण पिस्तूल विक्रीसाठी ग्राहकाची वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरिल तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीदरम्यान महेश कांबळे याने पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल, ८०० रुपयांचे एक जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Crime News

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४), सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड पुढील तपास करीत आहेत.

दोघांवर यापूर्वीच मकोकाचा गुन्हा

महेश कांबळे आणि गणेश पवार यांच्याविरुद्ध यापूर्वीही आर्म्स अॅक्ट तसेच खूनाचा प्रयत्न, मारहाण आणि संघटित गुन्हेगारी (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.

Crime News

Share