Skip to content

CRIME NEWS : शिवाजीनगरमध्ये साडेचार किलो गांजासह तळेगावचा तस्कर जेरबंद

एक जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

PG
Prashik Ghaste

2 min read

CRIME NEWS : शिवाजीनगरमध्ये साडेचार किलो गांजासह तळेगावचा तस्कर जेरबंद

एक जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS: पुणे शहरातील शिवाजीनगर रेल्वे रुळांजवळ आणि भैयावाडी नाल्याशेजारी अमली पदार्थ (गांजा) विकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका आंतरजिल्हा तस्कराला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर गांजा जप्त करण्यात आला आहे.CRIME NEWS

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित तस्कराचे नाव राहुल सदाशिव कांबळे (वय २८ वर्षे, रा. शेलारवाडी स्टेशन, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे असून, या गुन्ह्यात गांजाचा साठा पुरवणाऱ्या फरार आरोपी हैदर शफान इराणी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरामध्ये गुन्हेगारी नियंत्रण व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलीस नाईक सचिन जाधव आणि पोलीस शिपाई श्रीकांत मखरे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे परिसरातील एक तरुण भैयावाडी नाल्याजवळ आणि शिवाजीनगर रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या झाडीझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या बसला असून, तो गांजा विक्रीसाठी ग्राहकांची वाट पाहत आहे. माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी आपल्या सहकारी अंमलदारांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराला वेढा घातला. झाडीझुडपात लपून बसलेल्या राहुल कांबळे याला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त कारतण्यात आला. फरार आरोपी हैदर शफान इराणी याच्या सांगण्यावरून त्याने हा गांजा पुणे शहरात छुप्या पद्धतीने विक्रीसाठी आणल्याचे त्याने कबूल केले.CRIME NEWS

सदरची उल्लेखनीय कारवाई पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) श्री. पी. आर. पाटील, आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्री. चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार भाऊ चव्हाण, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, पोलीस नाईक सचिन जाधव, दीपक रोमाडे, आणि पोलीस शिपाई श्रीकांत मखरे व श्रीकृष्ण सांगवे यांच्या तपास पथकाने अत्यंत यशस्वीपणे केली.

CRIME NEWS

Share