Skip to content

Crime News : पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; नागरिकांना ३९ लाखांचा गंडा

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल ३९ लाख २२ हजार ८६२ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.Crime News

VZ
Vidula Zagade

1 min read

Crime News : पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; नागरिकांना ३९ लाखांचा गंडा

विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल ३९ लाख २२ हजार ८६२ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.Crime News

आंबेगाव बुद्रुक परिसरातील ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला विम्याचे पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने २८ लाख रुपयांची, तर सिंहगड रोड परिसरातील एका तरुणाची मोबाईल साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली १० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Crime News

आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात मोबाइलधारकांनी संपर्क साधून विम्याची रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी विविध कारणे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत सुमारे २८ लाख ३८ हजार ४६२ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींनी विम्याचे पैसे काढण्यासाठी सर्व्हिस टॅक्स, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, स्टॅम्प चार्जेस, फंड चार्जेस आणि सिक्युरिटी चार्जेस भरावे लागतील, असे फिर्यादींना सांगितले. विम्याची रक्कम मिळेण्याच्या अपेक्षेने फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र पैसे भरूनही विम्याची रक्कम परत मिळाली नाही. आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबधिताने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फेब्रुवारी २०२५ ते ८ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणात तब्बल २८ लाख ३८ हजार ४६२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोदगे अधिक तपास करीत आहेत.Crime News

खात्री करूनच पैसे गुंतवावेत

सायबर गुन्हेगार नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. विमा, गुंतवणूक किंवा परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींची खात्री करणे आवश्यक असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले.

Crime News

Share