CRIME NEWS : अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचे छापे; ६ गुन्हे दाखल
महिला आरोपीसह अनेकांना अटक
1 min read

महिला आरोपीसह अनेकांना अटक
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये महिला आरोपीसह अनेकांना अटक करण्यात आली असून, या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.CRIME NEWS

पहिली कारवाई दक्षिण चाकण हद्दीत भिमा नदीवरील स्मशानभूमीजवळ झाली. तेथे आरोपी गब्बर नागरसिंग राजपूत (रा. कोयाळी, खेड) याला आठ हजार ९०० रुपये किमतीच्या गावठी दारू तयार करण्याचे रसायनासह अटक करण्यात आली.CRIME NEWS
दुसरी कारवाई दापोडी पोलिसांनी बोपखेल येथे केली. तेथे एका महिला आरोपीच्या ताब्यातून ३१ हजार ५०० रुपयांची रॉयल व्हिस्की आणि दुचाकी असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत शिरगाव पोलिसांनी हर्षदा हॉटेलसमोर विशाल लक्ष्मण पवार (३५, रा. चांदखेड) याला ८८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांसह अटक केली.CRIME NEWS
चौथी कारवाई दक्षिण महाळुंगे पोलिसांनी खराबवडी येथे केली. तेथे सिमोन सुरेश राठोड (२६, रा. चाकण) याला सहा हजार रुपये किमतीची ६० लिटर गावठी दारू आणि सुझुकी ॲक्सेस स्कूटीसह एकूण एक लाख सहा हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.
पाचवी कारवाई हिंजवडी पोलिसांनी कासारसाई कॅनाल रोडवर केली. तेथे शिवा लक्ष्मण मारवाडी कुंभार (वय ४०, रा. वाकड) याच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली.CRIME NEWS
सहावी कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिसांनी केली असून, शुभमकौर सत्तेदास मनी (वय २७) या आरोपीला उषा-किरण बारच्या मालकाच्या सांगण्यावरून भाग्यश्री वाईन्सधून १० हजार ३२० रुपयांचे बिअर बॉक्स ॲक्टिव्हावरून अवैध वाहतूक करताना अटक केली. तसेच काळेवाडी पोलिसांनी अशोक पापालाल आहेर (७४, रा. पिंपरीगाव) याला २४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्यांसह अटक केली.
CRIME NEWS


