Skip to content

Crime News: तीन गावठी पिस्तुलांसह आरोपी जेरबंद; अवैध दारूविरोधातही धडक कारवाई

तीन ठिकाणी पिस्तूलांसह आरोपी अटक, अवैध दारू जप्त

M
Mubarak

3 min read

Crime News
pimpri chinchwad crime

तीन ठिकाणी पिस्तूलांसह आरोपी अटक, अवैध दारू जप्त

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवडमध्ये (Crime News) अवैध शस्त्रे व अवैध दारूविरोधात पोलिसांनी सलग धडक कारवाया करत पाच जणांना अटक केली आहे. वाकड, बावधन, दक्षिण महाळुंगे आणि उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे. (Crime News)

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (२९ जून) दुपारी ताथवडे येथील डांगे चौक ओव्हर ब्रिजजवळ फुटपाथच्या कडेला करण्‍यात आली आहे.

मनोज कुमार जोखईराम पाल (२६, लोंढे वस्ती, ताथवडे. मूळगाव उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल वंदु गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime: घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जवळ बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


सुसगावमध्‍ये देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (३० जून) संध्याकाळी मुळशी तालुक्यातील सुस येथील सनिज वर्ल्ड समोरील रस्त्यावर करण्यात आली.

CRIME NEWS : सोमाटणे फाटा येथे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

आकाश दयानंद गायकवाड (२२, सुसगाव, ता. मुळशी) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अरुण नरळे यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपी ६१ हजार रुपये किमतीचे एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरत होता. पोलिसांनी त्यास अटक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा: CRIME NEWS : दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक

निघोजेमध्‍ये गावठी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात

एका तरुणाला विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (३० जून) सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत पुजा हॉटेलजवळ करण्‍यात आली.

शेखर पोपट तांबे (२३, तांबेवाडी, वरुडे, ता. खेड) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कसबे यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे २५ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि पितळी जिवंत काडतूस आढळून आले. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहे.


भांबोलीत अवैध देशी दारू जप्त
एका मोकळ्या जागेत अवैधरित्या व विनापरवाना देशी दारूची विक्री करण्यासाठी साठा केल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (२९ जून) रात्री खेड तालुक्यातील भांबोली गावाच्या हद्दीत करण्यात आली.

विश्वजीत बिपीन कुमार महीलांगे (१९, भांबोली, ता. खेड) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल रामहरी शिंदे यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोस्ती चायनीज हॉटेलच्या बाजूला ५ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या एकूण ८८ बाटल्या विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगून होता. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.


गोनवडीमध्‍ये दारू विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

गावठी हातभट्टी दारूची अवैध विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (३० जून) दुपारी गोनवडी गावाच्या हद्दीतील नदीकाठी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.

जीवन मारुती राजपुत (४८, गोनवडी, ता. खेड) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कदम यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सतराशे रुपये किमतीची १७ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू बेकायदेशीर रित्या ताब्यात बाळगून विक्री करत होता. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहे.

Share