Skip to content

Crime News : २४ तासांत घरफोडी, अपहरण आणि लाखो रुपयांची चोरी

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर

M
Mubarak

4 min read

Crime News
pimpri chinchwad crime

Crime News : खेड-मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात चोऱ्यांचे सत्र; २४ तासांत ६ गंभीर गुन्ह्यांची नोंद!

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर

crime news : खेड, मावळ, भोसरी आणि काळेवाडी परिसरात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मावळमध्ये पेट्रोल पंपावरील कामगारांनी तब्बल २५ लाखांचा गंडा घातला आहे, तर आंबेठाणमध्ये एका नराधमाने लिव्ह-इन पार्टनरवर चाकू हल्ला करून २ वर्षांच्या मुलीला पळवून नेले आहे. याशिवाय सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि औद्योगिक चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. ( crime news pimpri chinchwad khed mawal bhosari)

काळेवाडीत घरफोडी प्रकरणी एकास अटक

काळेवाडी येथील एम एम चौक परिसरातील शिवकल्याण भोजनालयाचे मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने गल्ला आणि कपाटातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना ३० जून रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली.

शंकर सोपान सगर (१८, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक अधिकराव विश्वासराव भोसले (५३, ज्योतीबा नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शिवकल्याण भोजनालय' या हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट व गल्ल्यातील एकूण ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत. (crime news )

Pune Rain : पावसाची संततधार कायम; तरीही पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक


पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा

बँक खात्यात यूपीआयद्वारे पैसे वळवून आणि स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशोब लिहून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तीन कामगारांनी २५ लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

संजय रमेश बावीसकर (कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेंद्र रामाश्रय पांडे (जमशेदपूर, झारखंड), विजय बाबुराव त्रिभुवन (वराळे, मावळ) आणि चैतन्य विठ्ठल चांदेकर (मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यांनी फिर्यादी संजय यांचा विश्वास संपादन करून पेट्रोल व डिझेलचे पैसे स्वतःच्या व इतर कामगारांच्या बँक खात्यावर यूपीआयद्वारे पाठवून २५ लाखांची फसवणूक केली. आरोपींनी पेट्रोल पंपावरील स्टॉक रजिस्टर मध्ये खोटे हिशोब लिहून फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. (crime news )


लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने हल्ला; चिमुरडीचे अपहरण

एकत्र राहत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलेवर चाकूने हल्ला केला. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेले. ही घटना गुरुवारी (१ जुलै) दुपारी खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चांगदेव नागनाथ मुंडे (३०, मैंदवाडी, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news)

https://www.instagram.com/p/DaSdftMNxOS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांना स्वरा नावाची मुलगी आहे. आरोपी दारू पिऊन मारहाण करत असल्याने फिर्यादी वेगळ्या राहत होत्या. याच रागातून आरोपीने चाकूने फिर्यादीच्या डाव्या छातीवर वार करून तिला जखमी केले. तसेच मुलीला सोबत घेऊन गेला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Landslide : वरंधा घाटात दरड कोसळली; पंढरपूर-महाड मार्गावरील वाहतूक ठप्प


ट्रॅव्हल्स बस मधील बॅटरी, स्टेपनी चोरणाऱ्या दोघांना अटक

ट्रॅव्हल्स बसमधून ४५ हजार रुपये किमतीची बॅटरी आणि स्टेपनी चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (१ जुलै) सायंकाळी भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घडली.

लखन गौतम चौधरी (३०, पारोळा, जळगाव) आणि विजय प्रकाश कोळी (४३, आसोदा, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. ट्रॅव्हल्स चालक दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे (४८, धावडे वस्ती, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ट्रॅव्हल्स पार्क केली असता आरोपी  यांनी संगनमताने लबाडीच्या इराद्याने बसमधील मुद्देमाल चोरला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


दागिने चोरी प्रकरणी तरुणीवर गुन्‍हा दाखल

एका घरातून हँडबॅगमधील पर्स चोरून त्यातील आठ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी एका तरुणीवर गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (१ जुलै) सकाळी साळी धर्मशाळेसमोर आळंदी येथे घडली.

लता अंकुश चौधरी (६५, गोलेगाव, खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवानी निलेश जाधव (२३, वहिले आळी, आळंदी) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. (crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या घरातून आरोपी  हिने फिर्यादीच्या परवानगीशिवाय हँडबॅग मधून पर्स काढून त्यातील ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती


कंपनीतून २ लाखांच्या कॉपर कॉइलची चोरी

दोन लाख रुपये किमतीच्या एकूण २० कॉपर कॉइल चोरी केल्याची घटना खेड तालुक्यातील वासुली येथील जी.ई. एरोस्पेस कंपनीत उघडकीस आली आहे. ही घटना २१ मे व ३१ मे रोजी घडली.

चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी (३६, मोशी, मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुल अहद अन्सारी (३२, आकुर्डी, पुणे, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी  याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीतून वेगवेगळ्या वजनाच्या ४५ किलो, ३८ किलो व ९ किलो अशा एकूण २० कॉपर कॉइल चोरून नेल्या. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत. (crime news)

Share