CRIME NEWS : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १६.८१ लाखांची ऑनलाइन फसवणूक
बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार
1 min read

बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार
पुणे CRIME NEWS : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल १६.८१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

या प्रकरणी एका ४३ वर्षीय महिलेने (रा. पाषाण, पुणे) दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेदार आणि संबंधित खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२५ ते १३ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादी महिलेशी ऑनलाइन संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा आणि आकर्षक परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर विविध व्यवहारांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून आरोपींनी महिलेकडून एकूण १६ लाख ८१ हजार ४०० रुपये उकळले. अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.CRIME NEWS
या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिलारे करीत आहेत. पोलिसांकडून संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि ऑनलाइन व्यवहारांचा तपास सुरू आहे.
CRIME NEWS


