Skip to content

CRIME NEWS : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ४.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ४.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसर येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीची ४ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च ते २२ मे २०२६ या कालावधीत फिर्यादीला मोबाईलद्वारे संपर्क करून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगण्यात आले. आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. नफ्याचे खोटे आश्वासन देत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ४ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. नंतर कोणताही परतावा मिळाला नाही आणि आरोपींशी संपर्कही तुटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.CRIME NEWS

या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून सायबर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

CRIME NEWS

Share