Skip to content

CRIME NEWS : नसरापूर चिमुरडी हत्या प्रकरण: मृत्यूनंतरही शवावर अत्याचार

सरकारी पक्षाचा न्यायालयात दावा

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : नसरापूर चिमुरडी हत्या प्रकरण: मृत्यूनंतरही शवावर अत्याचार

सरकारी पक्षाचा न्यायालयात दावा

पुणे CRIME NEWS: भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याने मृत्यूनंतरही चिमुरडीच्या शवावर अत्याचार केल्याचा गंभीर दावा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष न्यायालयासमोर मांडत वैद्यकीय पुरावे सादर केले.CRIME NEWS

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान मिसर यांनी ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालाचा संदर्भ देत आरोपीने चिमुरडीचे अपहरण करून तिचा विनयभंग, अनैसर्गिक अत्याचार आणि हत्या केल्याचे नमूद केले. तसेच मृत्यूनंतरही शवावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांमधून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. या बाबीची न्यायालयानेही गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात आले.CRIME NEWS

१,१०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
नसरापूर येथे १ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक केली होती. तपास यंत्रणेने वेगाने तपास पूर्ण करत तब्बल १,१०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

दररोज इन-कॅमेरा सुनावणी
विशेष न्यायालयात या प्रकरणाची दररोज इन-कॅमेरा सुनावणी सुरू असून २९ मेपासून साक्षी नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सायबर तज्ज्ञांची साक्ष नोंदविण्यात आली, तर अंतिम साक्षीदार असलेल्या मुख्य तपास अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण करण्यात आली.CRIME NEWS

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही चित्रीकरण, पत्रव्यवहार, वैद्यकीय दाखले, शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील अन्य महत्त्वाचे पुरावे सादर केले. चिमुरडीवरील अत्याचार आणि मृत्यूचे कारण सांगताना तपास अधिकाऱ्यांचा कंठ दाटून आल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.CRIME NEWS

सरकार पक्षाचे म्हणणे मांडताना विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे सहाय्यक . प्रथमेश शिंगणे यांनी विविध तांत्रिक व वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर मांडले. अंतिम साक्षीदाराची साक्ष बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर आरोपीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर अंतिम युक्तिवादाला सुरुवात होईल, अशी माहिती अजय मिसर यांनी दिली.

CRIME NEWS

Share