Skip to content

CRIME NEWS : विश्रांतवाडीत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावली

फिर्यादी परिसरातून पायी जात होत्या तेंव्हा घडली घटना

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : विश्रांतवाडीत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावली

फिर्यादी परिसरातून पायी जात होत्या तेंव्हा घडली घटना

पुणे CRIME NEWS: विश्रांतवाडी परिसरात पायी चालत जाणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला या मेंटल कॉर्नर बसस्टॉपजवळील राधाकृष्ण हॉटेल परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या जवळ येत गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी झडप घालून हिसकावली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.CRIME NEWS

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

CRIME NEWS

Share