Skip to content

CRIME NEWS : वारजेत मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात

सहा दुचाकी जप्त करत तीन गुन्हे उघड; वारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई

PG
Prashik Ghaste

2 min read

CRIME NEWS : वारजेत मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात

सहा दुचाकी जप्त करत तीन गुन्हे उघड; वारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई

पुणे CRIME NEWS: पुणे शहर पोलीस दलाच्या वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल ६ वेगवेगळ्या दुचाकी हस्तगत केल्या असून, यामुळे शहरातील चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.CRIME NEWS

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना गणपती माथा परिसरात संशयास्पदरीत्या पांढऱ्या रंगाच्या दुचाकीसह थांबलेल्या या मुलाची पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. जप्त करण्यात आलेल्या वाहनांद्वारे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २ आणि अलंकार पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ३ गुन्हे उघड झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.CRIME NEWS

गस्तीदरम्यान संशयित मुलगा थांबलेला आढळला
सविस्तर माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणाच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत होते. गस्तीदरम्यान गणपती माथा, वारजे येथे एक संशयित मुलगा पांढऱ्या रंगाच्या होंडा ॲक्टिव्हा दुचाकीसह थांबलेला पोलिसांना आढळला.

पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी त्याच्याजवळ जाऊन दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याने पोलिसांना पाहून घाबरून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांना त्याचा तीव्र संशय आल्यामुळे त्यांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने सदरची ॲक्टिव्हा दुचाकी वारजे येथील सह्याद्री शाळेच्या समोरून चोरल्याची कबुली दिली.CRIME NEWS

मौजमजेसाठी वेगवेगळ्या भागांतून चोरल्या अनेक दुचाकी
त्यानंतर पोलिसांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांतून आणखीही अनेक दुचाकी वाहने चोरल्याचे कबूल केले. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या एकूण ६ दुचाकी हस्तगत केल्या.

यामध्ये होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (क्रमांक एमएच १२ केएल ७६६०), हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक एमएच १७ एआर १९९८), हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी (क्रमांक एमएच १२ एनक्यू २४१०), हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक एमएच १२ एफक्यू १८८२), होंडा शाईन दुचाकी (क्रमांक एमएच १४ एचएन ५८९२) आणि हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक एमएच १२ ईसी ७२२३) या वाहनांचा समावेश आहे. या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अल्पवयीन मुलावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.CRIME NEWS

सदरची उल्लेखनीय कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त डॉ. सागर कवडे आणि कोथरुड विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर आणि निखिल तांगडे यांच्या पथकाने केली आहे.

CRIME NEWS

Share