CRIME NEWS : प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन केली होती आत्महत्या
1 min read

सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन केली होती आत्महत्या
पुणे CRIME NEWS: एका २१ वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 23 वर्षीय युवती असून तिचा भाऊ विशाल भैरम काळे (वय २१, मूळ रा. शिरूर, सध्या कोरेगाव पार्क) याने १ जून २०२६ रोजी आत्महत्या केली. ही घटना कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगर चौक सिग्नल परिसरात उघडकीस आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विशालचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांवरून संबंधित तरुणीचे नातेवाईक असलेल्या चेताली उर्फ चेतू चंदू भोसले, रोहित चंदू भोसले, ऋषिकेश चंदू भोसले, कोला काळूराम काळे आणि परशान काळूराम काळे (सर्व मूळ रा. शिरूर) यांनी विशालकडे लग्नासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींकडून वारंवार मारहाण, त्रास व मानसिक छळ करण्यात आल्याने विशाल नैराश्यात गेला. या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.CRIME NEWS
या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.CRIME NEWS
टीप : हा गुन्हा फिर्यादींच्या तक्रारीवर आधारित असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप तपासाअंती न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे आवश्यक आहे.CRIME NEWS
CRIME NEWS


