Skip to content

CRIME NEWS : चंदननगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीला अटक

माहेरहून 'कार आणि घरासाठी पैसे घेऊन ये' म्हणून छळ

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : चंदननगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीला अटक

माहेरहून 'कार आणि घरासाठी पैसे घेऊन ये' म्हणून छळ

पुणे: चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम नगर येथील विशाललीला सोसायटीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. माहेरून कार आणि नवीन घर खरेदी करण्यासाठी सतत पैशांची मागणी करत एका २५ वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५ वर्षे) असे या मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत तेजस्विनी यांच्या ५२ वर्षीय वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

पाच वर्षे सतत मानसिक आणि शारीरिक छळ
फिर्यादीनुसार, जून २०२१ पासून ते ३ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी तेजस्विनी हिला सतत मानसिक आणि शारीरिक छळ दिला. 'माहेरून कार घेण्यासाठी आणि घर घेण्यासाठी पैसे आण' असा तगादा लावत पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३२), सासरे संभाजी सोनवणे (वय ६२) आणि सासू अलका संभाजी सोनवणे (वय ५५) यांनी तिला प्रचंड त्रास दिला.CRIME NEWS

या सततच्या जाचाला आणि छळाला कंटाळून अखेर तेजस्विनी हिने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८०, १०८, ३५२, ३५१(२), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती गोरख सोनवणे याला अटक केली असून, सासू आणि सासऱ्यांवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे करत आहेत.

CRIME NEWS

Share