Crime News पुणे जिल्ह्यातून विषारी दारू बनविणारे रॅकेट उद्धवस्त
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विषारी दारू बनविण्याऱ्या कारखान्यावर छापा मारत एक मोठे रॅकेट उद्धवस्त केले आहे.
2 min read

कुरकुंभ एमआयडीसीतून ३,४२० किलो बंदी घातलेले ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त; १५ लाख लीटर विषारी दारू बनवण्याचा कट उधळला
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विषारी दारू बनविण्याऱ्या कारखान्यावर छापा मारत एक मोठे रॅकेट उद्धवस्त केले आहे. या कारवाईत विषारी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ३,४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि ५,८०० लीटर रॉ केमिकलसह हायटेक मशिनरी असा एकूण कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे तब्बल १५ लाख लीटर विषारी दारू बनवण्याचा माफियांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. तसेच, या कारवाईत मुख्य संशयित चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारखान्याच्या मालकावर यापूर्वीही अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. Crime News

कारखाना मालक किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), केमिकल बनवणारा मुख्य सुत्रधार व केमिस्ट शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५२), गुन्ह्यात मदत करणारा संशयित नबी सरवर जमीर सिद्धीकी (वय ४०), बेकायदेशीर कारखान्यात कार्यरत संशयित आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.Crime News

कुरकुंभ एमआयडीसी परिसराते ‘समर्थ लॅबोरेटरीज’ या ठिकाणी एनडीपीएस (NDPS) गुन्ह्यातील संशयित आरोपी किशोर सुर्वे याच्या कारखाना परिसरात शैलेश ठाकूर हा एम.डी ड्रग्ज बनवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कोल्हापूर कृती विभागाला मिळाली होती. त्यानुसार दीड महिन्यांपासून येथे पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पिवळ्या रंगाचा ३,४२० किलो स्फटिक सदृश्य रासायनिक पदार्थ आणि ५,८०० लीटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले.Crime News

ही धडक कारवाईवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली आहे.Crime News
प्रयोगशाळेतून धक्कादायक खुलासा
या पदार्थांची न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा (FSL), पुणे यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. तेथून आलेल्या अहवालानुसार स्फटिकासारखा पदार्थ सरकारद्वारे प्रतिबंधित केलेले ‘क्लोरल हायड्रेट’ हे अत्यंत घातक केमिकल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे केमिकल मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, याचा वापर प्रामुख्याने प्रामुख्याने विषारी दारू (ताडी किंवा गावठी दारूची तीव्रता वाढवण्यासाठी) तयार करण्यासाठी केला जातो. या क्लोरल हायड्रेटपासून तब्बल १५ लाख लीटर विषारी दारू तयार केली जाऊ शकत होती.Crime News

कोट्यवधी रुपयांच्या मशिनरी जप्त
या कारवाईत ड्रग्ज किंवा रासायनिक पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सेंट्रीफ्युगल मशीन आणि जीएलआर मशीन मिळून आले आहे.जप्त केलेल्या या मशिनरींची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे. तर जप्त करण्यात आलेल्या रासायनिक पदार्थांचे बाजारपेठेतील एकूण किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
कारखाना मालकावर यापूर्वीही गुन्हा दाखल
कारखान्याचा मालक किशोर सुर्वे याच्याविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.तसेच, संपूर्ण केमिकल साठा संशयित आरोपी शैलेश ठाकूर यानेच तिथे बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मोठी जिवीतहानी टळली
या धडक कारवाईमुळे महाराष्ट्रातील एका मोठ्या अंमली पदार्थ आणि विषारी दारू निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. १५ लाख लीटर विषारी दारू बाजारात जाण्यापूर्वीच रोखल्यामुळे संभाव्य मोठी जिवीतहानी टळली आहे. पोलीस या प्रकरणातील आंतरराज्यीय धागेदोरे आणि पुरवठा साखळीचा तपास करत आहेत.


