CRIME NEWS : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
४.८१ लाखाचा मुद्देमाल व चारचाकी वाहन जप्त
1 min read

४.८१ लाखाचा मुद्देमाल व चारचाकी वाहन जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : पुणे जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी व विदेशी मद्य वाहतूक आणि साठवणुकीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४,८१,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बनावट दारूचे रॅकेट चालवणाऱ्या ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.CRIME NEWS

गोपनीय माहितीच्या आधारे केली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, बोरीबेल गावच्या हद्दीत रेल्वे गेटजवळ (दौंड-रावणगाव रस्ता, ता. दौंड) सापळा रचण्यात आला. रावणगावकडून दौंडच्या दिशेने येणाऱ्या एका मारुती सुझुकी अल्टो गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये 'टँगो पंच'या देशी दारूच्या ३,१०० सीलबंद बाटल्या आढळल्या.CRIME NEWS
या कारवाईत घटनास्थळावरून देशी दारूच्या साठ्यासह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, मद्य वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
PUNE NEWS


