CRIME NEWS : फुरसुंगीतील पीजीत लॅपटॉप, मोबाईलसह ९६ हजारांचा ऐवज गेला चोरीला
रूमचा दरवाजा आतून बंद केला असतानाही अज्ञात चोरट्याचा आत प्रवेश
1 min read

रूमचा दरवाजा आतून बंद केला असतानाही अज्ञात चोरट्याचा आत प्रवेश
पुणे CRRIME NEWS : फुरसुंगी येथील एका को-लिव्हिंग पीजीमध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा जवळपास ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.CRIME NEWS
दि. ४ जून २०२६ रोजी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान भेकराईनगर येथील भेकराईमाता मंदिराजवळ असलेल्या झोलो व्हीजडम को-लिव्हिंग पीजीच्या पाचव्या मजल्यावरील रूम क्रमांक ५०५ मध्ये ही चोरी झाली. फिर्यादी यांनी रूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला असतानाही अज्ञात चोरट्याने कडी उघडून आत प्रवेश केला. CRIME NEWS
यानंतर आरोपीने खोलीतील १,६०० रुपये रोख रक्कम, लॅपटॉप आणि मोबाईल फोन असा एकूण ९६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.
CRIME NEWS


