Skip to content

CRIME NEWS : इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्याची बतावणी; एपीके फाईल डाउनलोड करून ६.३९ लाखांची फसवणूक

संशयास्पद फाईल्स, अॅप्स किंवा लिंक डाउनलोड न करण्याचे नागरिकांना आवाहन

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्याची बतावणी; एपीके फाईल डाउनलोड करून ६.३९ लाखांची फसवणूक

संशयास्पद फाईल्स, अॅप्स किंवा लिंक डाउनलोड न करण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे CRIME NEWS : इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी करून एका ४२ वर्षीय व्यक्तीची ६ लाख ३९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे.

या प्रकरणी ४२ वर्षीय फिर्यादी (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेदार आणि संबंधित खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ मे २०२६ रोजी आरोपीने फिर्यादीला फोन करून आपण इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. क्रेडिट कार्डवर सक्रिय असलेली विमा पॉलिसी बंद करण्यासाठी प्रक्रिया करावी लागेल, असे सांगून आरोपीने फिर्यादीला एक एपीके (APK) फाईल पाठवली. सदर फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास भाग पाडल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलचा प्रवेश (अॅक्सेस) मिळवला. त्यानंतर बँक खात्यांमधील व्यवहारांद्वारे एकूण ६ लाख ३९ हजार १९ रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.CRIME NEWS

या प्रकरणाचा पुढील तपास मांजरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इरफान नदाफ करीत आहेत.

नागरिकांसाठी सूचना

सायबर गुन्हे शाखेकडून नागरिकांना अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या एपीके फाईल्स, अॅप्स किंवा लिंक डाउनलोड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना अशा प्रकारे एपीके फाईल डाउनलोड करण्यास सांगत नाही. संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

CRIME NEWS

Share