Skip to content

CRIME NEWS : चाकणमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; ९ लाखांचा माल जप्त

नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने केले काम

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : चाकणमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; ९ लाखांचा माल जप्त

नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने केले काम

पिंपरी CRIME NEWS : चाकण मार्केट यार्ड परिसरात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना ३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चाकण मार्केट यार्ड जवळील बालाजी गॅस एजन्सी शेजारी घडली.CRIME NEWS

या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस शिपाई समीर रासकर यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सिद्धन्ना जवलघी (३२, चाकण), तुषार प्रफुल्ल वारुळे (३६, चाकण) आणि शुभम प्रवीण परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून नोझलच्या साहाय्याने दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला होता. हा पदार्थ अत्यंत ज्वलनशील असून येथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी या कारवाईत ९ लाख ७१ हजार रुपयांच्या मालासह सिलेंडर जप्त केले आहेत. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS

CRIME NEWS

Share