CRIME NEWS : गावठी पिस्तुलसह सराईत गुन्हेगार गजाआड
लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1 min read

लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: देशी बनावटीचे गावठी पिस्तुल जवळ बाळगणारा आणि खूनाचा कट रचणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलासह गजाआड केले. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.CRIME NEWS

सुफियान शब्बीरखान (वय २७, रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट ७ चे तपास पथक आपल्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना, पोलीस हवालदार निलेश साळवे आणि पोलीस हवालदार प्रशांत कापुरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, अभिलेखावरील फरार आरोपी सुफियान शब्बीरखान हा लोहगाव येथील पवारवस्ती ते हरणतळेवस्ती रस्त्यावरील स्मशानभूमीच्या परिसरात काही बेकायदेशीर कृत्य करण्याच्या किंवा घातपात करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ तेथे धाव घेऊन स्मशानभूमीच्या परिसरात सापळा रचला. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मिळून आले.CRIME NEWS
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर, नितीन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, भरत गुंडवाड तसेच महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे, प्रतीक्षा पानासरे आणि कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली.CRIME NEWS
गंभीर गुन्हे दाखल
सुफियान शब्बीरखान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा कट रचणे यांसारखे चंदननगर पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर विमानतळ पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल आहे. तसेच चंदननगर पोलीस ठाण्यातील एका न्यायालयीन वॉरंट प्रकरणात तो फरार घोषित होता.
CRIME NEWS


