Skip to content

CRIME NEWS : चिखली मधून सहा लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : चिखली मधून सहा लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

पिंपरी CRIME NEWS : चिखली परिसरातील कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ अन्न व औषध प्रशासन विभागाने एका मोठ्या कारवाईत ६ लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित व सुगंधी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा बेकायदेशीर साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (४ जून) रात्री केली.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय शेळके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुस्तमखान, बाबरखान, नबीखान, वैभव अर्जुन यादव, राजू श्रीवास्तव आणि मनोज चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पानमसाला यांच्या विक्री व साठवणुकीवर बंदी आहे. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि यामुळे कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो हे माहीत असतानाही आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा जमा केला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS :

महेशनगर येथे टपरीवर कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी दुसरी कारवाई महेशनगर पिंपरी येथे श्रद्धा पान शॉप या टपरीवर केली. या प्रकरणी गजानन बालाजी चिमेगाव (२८, थेरगाव) याच्या विरोधात संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन याने त्याच्या टपरी मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला होता.

CRIME NEWS :

Share