Skip to content

CRIME NEWS : वानवडी परिसरात महिलेवर जीवघेणा हल्ला; एकाला अटक

फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून झाला वाद

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : वानवडी परिसरात महिलेवर जीवघेणा हल्ला; एकाला अटक

फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून झाला वाद

पुणे CRIME NEWS: वानवडी पोलीस ठाण्यात एका ४४ वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ४४, रा. आंबेगाव पठार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन लक्ष्मण मांडवे (वय ३७, रा. सातारा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.CRIME NEWS

ही घटना ६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास वानवडी येथील आयसीटीएस हॉस्पिटलच्या पार्किंग परिसरात घडली. फिर्यादी आणि आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेणे तसेच त्यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
वादाच्या रागातून आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत धारदार हत्याराने हल्ला केला.CRIME NEWS

फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. वाकडे करीत आहेत.

CRIME NEWS

Share