CRIME NEWS : चऱ्होलीत वृद्ध महिलेची निर्घृण हत्या
गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
1 min read

गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरात एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह घरामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी (१६ जून) दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.CRIME NEWS

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला काळूराम गिलबिले, असे मृत महिलेचे नाव आहे. त्या चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरातील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या पतीचे यापूर्वी निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अलीकडेच दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेल्याने त्या सध्या एकट्याच वास्तव्य करत होत्या.CRIME NEWS
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दिघी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
केवळ चोरीसाठी हत्येची शक्यता कमी
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना महिलेचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याचे दिसून आले. सुरुवातीला चोरीच्या उद्देशातून हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच असल्याचे तपासात आढळून आल्याने केवळ चोरीसाठी हत्या करण्यात आल्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे मत आहे. यामुळे आता पोलिसांनी मालमत्तेच्या वादासह अन्य वैयक्तिक कारणांच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. महिलेच्या नातेवाइकांची चौकशी करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.CRIME NEWS
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसराची नाकेबंदी करून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे नमुने ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या गुन्ह्याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.
CRIME NEWS


