Skip to content

CRIME NEWS : सराईताकडून गावठी पिस्तूलसह काडतुसे जप्त

डेक्कन पोलिसांची कारवाई

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : सराईताकडून गावठी पिस्तूलसह काडतुसे जप्त

डेक्कन पोलिसांची कारवाई

पुणे CRIME NEWS: सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे डेक्कन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जप्त करत, आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली.CRIME NEWS

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक ९ जून रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिल आरोपी हा भिडे पुलाजवळील नदीपात्र परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याचे समजले. त्यानुसार तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आढळलेली सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.CRIME NEWS

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवताळे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.CRIME NEWS

आरोपीवर दाखल झालेले एकूणा गुन्हे
श्रीकांत मरळ याच्याविरुद्ध यापूर्वीही पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, मारहाण, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

CRIME NEWS

Share