Skip to content

CRIME NEWS : खंडणीप्रकरणी एकावर गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS : खंडणीप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PG
Prashik Ghaste

1 min read

CRIME NEWS : खंडणीप्रकरणी एकावर गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर CRIME NEWS: खंडणीप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप पोपट भागवत (रा. कुरकुंभ, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. चांगदेव सावता बनकर यांनी याबाबत फिर्याद दिली.CRIME NEWS

फिर्यादीनुसार संदीप भागवत याने वेळोवेळी तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच नंतर तडजोडीच्या नावाखाली ५ ते ६ लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली. ही मागणी केवळ आर्थिक लाभासाठी नसून स्वतःचा जप्त झालेला शस्त्र परवाना वाचवणे, फिर्यादीविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज मागे घेणे आणि फिर्यादीच्या इमारत बांधकाम प्रकरणातील कारवाई थांबवणे या कारणांसाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.CRIME NEWS

आरोपी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असल्याची चर्चा दौंड शहरासह औद्योगिक वसाहत परिसरात रंगली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

CRIME NEWS

Share