Skip to content

Crime News : ‘फटाका’ फोडणे पडले महागात; २७४ वाहनांना कारवाईचा दणका

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News: शहरातील ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेकडून मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर असलेल्या वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

VZ
Vidula Zagade

1 min read

Crime News : ‘फटाका’ फोडणे पडले महागात; २७४ वाहनांना कारवाईचा दणका

पुणे वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर;पावणे तीन लाखांचा दंड वसूल

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News: शहरातील ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेकडून मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर असलेल्या वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. रविवार (दि.२) ऑगस्ट २०२६ ते आतापर्यंत झालेल्या कारवाईत २७४ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २ लाख ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.Crime News

वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान एक लाख २२ हजारांची दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. तसेच ८५ मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर जप्त करण्यात आले असून उर्वरित वाहनांवरील कारवाई सुरू आहे.

मॉडिफाईड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनीप्रदूषण नागरिकांसाठी मोठा त्रासदायक ठरत असल्याने अशा वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.Crime News

कारवाई सुरूच राहणार

“नियमबाह्य मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून ध्वनीप्रदूषणमुक्त पुणे शहर घडविण्यास सहकार्य करावे,” असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.Crime News

Crime News

Share